नवी दिल्ली: वीस वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकलेला सट्टेबाज याला गुरुवारी भारतात आणण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने लंडनहून संजीव याला भारतात आणले.

वाचा-
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संजीव चावलासह दिल्ली पोलिस दलाचे पथक उतरले. काल (बुधवारी) संजीवला स्कॉटलंड यार्डकडून ताब्यात घेण्यात आले होते. ५० वर्षीय संजीव याच्यावर २००० मध्ये एका क्रिकेट केल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने त्याची जामीन याचिका रद्द करत भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा आदेश दिला होता.

वाचा-

चावलाच्या प्रत्यार्पणासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने गेल्या महिन्यात अनेक वेळा लंडनचा दौरा केला होता. त्यानंतर चावलाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. डीसीपी (गुन्हे) जी राम गोपाल नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्कॉटलंड यार्डकडून बुधवारी चावलाला ताब्यात घेतले. स्कॉटलंड यार्डकडून मोस्ट वॉटेड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाज चावला याला रात्री अडीचच्या सुमारास भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हीथ्रो विमानतळावर त्याचा ताबा भारतीय पोलिसांनी घेतला.

वाचा-

दक्षिण आफ्रिकेचा संघ २००० साली भारताच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात संजीव चावला आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांनी मॅच फिक्सिंग केले होते. भारत आणि आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका झाली होती.

वाचा-
चावला एक व्यावसायिक होता. १९९६ मध्ये तो व्यवसायासाठी व्हिसा घेऊन लंडनला गेला. २००० मध्ये त्याचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. त्यानंतर २००५ मध्ये त्याला ब्रिटनचा पासपोर्ट मिळाला होता. तो सध्या ब्रिटनचा नागरिक आहे. २००० साली झालेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणात हॅन्सी क्रोनिए समोर त्याला उभे करण्यात आले होते.

फिक्सिंग प्रकरणी हॅन्सी क्रोनिएच्या चौकशीत संजीव चावलाचे नाव समोर आले होते. या फिक्सिंग प्रकरणात आफ्रिकेच्या हर्शल गिब्ससह अन्य तीन खेळाडूंवर आरोप होते.

वाचा-
फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या क्रोनिएवर आजन्म क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. २००२ मध्ये एका विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here