नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेचे अद्याप वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी अनेक संघांनी तयारी सुरू केली आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध उपविजेता यांच्यात मुंबईत होणार आहे. दोन्ही संघ यावेळी देखील विजेतेपदाचे दावेदार आहेत. चेन्नईचा कर्णधार पुन्हा मैदानात दिसणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या या हंगामाची अनेकांना प्रतिक्षा आहे.

चेन्नईचा खेळाडू सुरेश रैनाने महेंद्र सिंह धोनीला भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम करणार असल्याचे म्हटले आहे. द सुपर किंग्ज शो मध्ये बोलताना रैना म्हणाला, आमच्याकडे सर्वोत्तम कर्णधार होता. ज्याने भारतीय संघालाच बदलून टाकले आणि आता चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये अशीच अवस्था असल्याचे, रैनाने सांगितले.

वाचा-
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ३८ वर्षीय धोनी वनडे आणि टी-२० सामन्यात खेळत असला तरी गेल्या वर्षी वर्ल्ड कपनंतर तो मैदानात उतरलेला नाही. धोनी आता थेट आयपीएलच्या मैदानात चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल.

वाचा-
धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीवरच तो भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप खेळेल का हे ठरणार आहे. धोनी हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार असल्याचे मत याआधी हिटमॅन रोहित शर्माने देखील व्यक्त केले होते.

यावर्षी चेन्नई संघात पीयुष चावला, जोश हेजलवुड, सॅम कुरेन आणि के साई किशोर सारखे खेळाडू आहेत. संघात नवे आणि सिनिअर अशा खेळाडूंचा समावेश असल्याचे रैना म्हणाला.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here