वाचा-
न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी भारतीय संघाचा न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या सराव सामन्याला आज सुरूवात झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीची जोडी पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे दोघे अनुक्रमे शून्य आणि १ धाव करून बाद झाले. त्यानंतर शुभमन गिल देखील शून्यावर बाद झाला. भारताची अवस्था ३ बाद ५ अशी झाली. अजिंक्य रहाणे देखील १८ धावा करून माघारी परतला.
वाचा-
भारतीय संघाची अवस्था ४ बाद ३४ अशी असताना चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी हे भारताच्या मदतीला धावून आले. त्यांनी पाचव्या विकेटसाठी १९५ धावांची भागिदारी केली. पुजारा ९३ धावांवर बाद झाला. तर विहारीला शतकी खेळी केल्यानंतर दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. पुजार-विहारी जोडी माघारी परतल्यानंतर भारताचा डाव कोसळला आणि २६३ धावांवर ऑल आऊट झाला.
वाचा-
गेल्या अनेक सामन्यात संधी न मिळालेल्या पंतला या सामन्यात संघात स्थान देण्यात आले. पण तो ७ धावा करून बाद झाला. पंतला संघात संधी दिली जात नसल्यावरून विरेंद्र सेहवागने काही दिवसांपूर्वी टीका केली होती. पण आज संधी मिळाल्यानंतर तो पुन्हा एकदा अपयशी ठरला.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times