हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. येत्या २१ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध भारताचा तीन दिवसांचा सराव सामना आजपासून सुरू झाला. या सामन्यात भारतीय संघाची पोलखोल झाली आहे.

सराव सामन्यात भारताचे आठ फलंदाज अपयशी ठरले आहेत. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, सलामीवीर , आणि शुभमन गिल आघाडीचे तिनही फलंदाजी सपशेल अपयशी ठरले. पृथ्वी आणि शुभमन शून्यावर बाद झाले. तर मयांक एक धाव करून माघारी परतला.

वाचा-
भारतासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला. आघाडीचे फलंदाज बाद झाले तेव्हा भारताची अवस्था ४ बाद ३८ अशी झाली होती.

कसोटीतील अनुभवी अजिंक्य रहाणे देखील १८ धावा करून बाद झाला. तर अनेक दिवसांनी संघात स्थान मिळालेला ऋषभ पंत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

वाचा-
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चार भारतीय फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही. तर चार जणांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही. भारताच्या धावफलकाकडे पाहिल्यास विहारीने सर्वाधिक १०१ तर पुजाराने ९३ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अवांतर धावा (२६) होत्या. भारताचा संघ ७८.५ षटकात २६३ धावांवर बाद झाला.

वाचा-

विहारीचे शतक
विहारीने १८२ चेंडूत ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या. दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. तर अनुभवी पुजाराने २११ चेंडूत १ षटकार आणि ११ चौकारांसह ९३ धावा केल्या. त्याचे शतक ७ धावांनी हुकले. विहारीच्या या खेळीबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here