नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडच्या एका खेळाडूसाठी खास असेल. जगातील कोणत्याही खेळाडूने आजवर अशी कामगिरी केली नाही ती करण्याची संधी क्रिकेटपटूला मिळणार आहे.

वाचा-
भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा १०० वा कसोटी सामना असेल. जगातील अनेक क्रिकेटपटूंनी शंभर कसोटी सामने खेळले आहेत. पण असा पहिला क्रिकेटपटू असेल ज्याने वनडे, टी-२० आणि कसोटीमध्ये शंभर सामने खेळले आहेत.

वाचा-
जगातील कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात प्रत्येकी १०० सामने खेळले नाहीत. काही खेळाडूंनी वनडे, टी-२० क्रिकेटमध्ये १०० तर काहींनी वनडे आणि कसोटीमध्ये १०० सामने खेळले आहेत. पण तिन्ही प्रकारात १०० सामने खेळणारा टेलर पहिला खेळाडू ठरेल.

टेलरने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत १००वा सामना खेळला होता. आता कसोटीमध्ये देखील तो हा पराक्रम करणार आहे. टेलरने न्यूझीलंडकडून २३२ वनडे तर १०० टी-२० आणि ९९ कसोटी सामने खेळले आहेत. टेलरच्या आधी १०० टी-२० सामने खेळण्याची कामगिरी भारताच्या रोहित शर्मा आणि पाकिस्तानच्या शोएब मलिकने केली आहे.

वाचा- केल्या
कोणत्याच खेळाडूचे करिअर परफेक्ट असत नाही. अनेक वेळा तुम्ही अपयशी ठरता. चुका आणि परिस्थिती तुम्हाला परिपक्व बनवते, असे टेलर म्हणाला. १००वी कसोटी किती महत्त्वाची आहे? या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, आता मी म्हातारा होत चाललो आहे असे वाटते. पण जे काही मिळवले आहे. त्यामुळे मी खुश आहे.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here