नवी दिल्ली: इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेचे विजेते मँनचेस्टर सिटी संघाला आर्थिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०००-२१ आणि २०२१-२२ स्पर्धा खेळण्यास बंदी घातली आहे. आर्थिक फेअर प्ले नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी क्लबवर ही कारवाई झाली आहे. त्याच बरोबर संघाला ३० मिलियन युरो जवळपास २.३२ अब्ज रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे.

युएएफएच्या आर्थिक नियंत्रण समितीने मँनचेस्टर सिटी संघाने स्पॉन्सरशिपमधून मिळालेल्या निधीला चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचे म्हटले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये जर्मन वृत्तपत्र डेर स्पीगेलने ईमेल आणि कागपत्रांची एक मालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर सिटी संघाची चौकशी सुरू करण्यात आली.

वाचा-
UEFAने २२ जानेवारी २०२० रोजी यासंदर्भातील अंतिम सुनावणी केली. कुन्हा रॉड्रिक्सच्या अध्यक्षतेखालील समितीने मँनचेस्टर सिटी संघाविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सिटीने मिळालेल्या निधीची योग्य माहिती दिली नाही आणि आर्थिक फेअर प्ले नियमांचे उल्लंघन केल्याचे UEFAने म्हटले आहे.

वाचा-
सिटीवर झालेल्या आरोपची चौकशी करताना क्लबने सहकार्य देखील न केल्याचा UEFAने म्हटले. मँनचेस्टर सिटी फुटबॉल क्लबला २०२०-२१ आणि २०२१-२२ या पुढील दोन सत्रासाठी युएफा क्लबकडून आयोजित स्पर्धेत खेळता येणार नाही. याशिवाय ३० मिलियन युरो दंड देखील देण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here