नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. होय आतापर्यंत फक्त चर्चा असलेली ही गोष्ट आता पक्की झाली आहे.

आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरूवात येत्या २९ मार्चपासून होत आहे. यासाठी धोनी लवकर सराव सुरू करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि चाहते त्यांच्या थाला (लिडल)ची वाट पाहत आहेत.

वाचा-
धोनीने केल्या वर्षी १० जुलै रोजी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मॅनचेस्टरमध्ये वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये धोनी खेळला होता. या सामन्यात धोनी धावाबाद झाला आणि भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आले. मिलीमीटरच्या एका चुकीमुळे धोनी मैदान, सराव सत्र आणि क्रिकेटपासून दूर झाला.

वाचा-
गेल्या काही महिन्यात धोनीच्या निवृत्तीबद्दल देखील चर्चा झाली. अनेकांनी त्याच्या क्रिकेट न खेळण्याबद्दल देखील शंका उपस्थित केली होती. धोनी भविष्यातील योजनेसंदर्भात स्वत: तो किंवा बीसीसीआयकडून देखील काहीच बोलले गेले नव्हते.

आयपीएलमध्ये धोनी खेळणार हे आधीच निश्चित झाले होते. आता या स्पर्धेतील कामगिरीवर त्याचे भारतीय संघातील स्थान ठरणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमात निवृत्तीसंदर्भातील प्रश्नावर धोनीने जानेवारीपर्यंत मला काही विचारू नका,असे म्हटले होते.

वाचा-
गेल्या सात महिन्यात धोनी फक्त एकदाच नेटमध्ये सराव करताना दिसला. रांचीमध्ये झारखंड रणजी संघासोबत त्याने सराव केला होता. सरावाच्या वेळी देखील धोनीने त्याचा जुना फॉर्म दाखवला होता.

असा आहे प्लॅन
धोनी २९ फेब्रुवारी रोजी चेन्नईत दाखल होणार आहे. १ मार्चपासून तो संघासोबत सरावाला सुरूवात करेल. सरावासाठी २४ पैकी १५ ते १६ खेळाडू असतील. अन्य खेळाडू मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात येतील. आयपीएलमधील पहिला सामना २९ मार्च रोजी चेन्नई विरुद्ध मुंबईचा आहे. त्याआधी चेन्नईच्या खेळाडूंसोबत ३ ते ४ सराव सामने होणार आहेत. हे सामने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहेत. सामने पाहण्यासाठी चाहत्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here