मेंगळुरू: कर्नाटकमधील मुदबिद्रीचा रहिवाशी एका रात्रीत लोकप्रिय झाला आहे. गेल्या ४८ तासापासून देशभरात इंटरनेटवर श्रीनिवासच्या नावाची चर्चा आहे. अर्थात यासाठी स्वत: श्रीनिवासने काहीही केले नाही. निमित्त ठरले एका व्हायरल पोस्टचे आणि लोकांनी थेट त्याची तुलना जगातील सर्वात वेगवान धावपूट जमैकाच्या याच्याशी करण्यास सुरूवात केली.

वाचा-
एका पत्रकाराने श्रीनिवास गौडाच्या म्हशींच्या शर्यतीची पोस्ट ट्विटवर शेअर केली. श्रीनिवासने १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले. याचा अर्थ त्याने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले, असा दावा या पोस्ट मध्ये करण्यात आला होता. जगातील सर्वात असलेल्या बोल्टने १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले होते. त्यामुळे श्रीनिवास बोल्टपेक्षा वेगाने धावतो, असे म्हटले गेले होते.

वाचा-
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि अनेक वेबसाइटवर श्रीनिवासची बातमी झळकली. श्रीनिवास कुठे राहतो, काय करतो, तो खरच इतक्या वेगाने पळतो का वैगरे चर्चा सुरू झाल्या.

याबाबत ANI वृत्तसंस्थेने त्याची प्रतिक्रिया घेतली. लोक माझी तुलना उसेन बोल्टशी करत आहेत. तो एक जागतिक धावपटू आहे. मी फक्त धावतो, असे विनम्रपणे श्रीनिवास म्हणाला.

कर्नाटकात होणाऱ्या या म्हशींच्या शर्यतींना कंबाला असे म्हणतात. राज्यातील दक्षिण कन्नडा आणि उडपी जिल्ह्यात शेतकरी या शर्यती प्रत्येक वर्षी आयोजित करतात.

श्रीनिवास गौडा खरच १०० मीटर अंतर ९.५५ सेकंदात पार करता का हे महाराष्ट्र टाइम्सने तपासून पाहिले नाही. पण संबंधित पोस्ट टाकणाऱ्या पत्रकाराने असा दावा केला आहे.

वाचा-
श्रीनिवास दोन म्हशींसोबत चिखल असलेल्या पाण्यातून धावातो. म्हशी आणि पाणी यामुळे श्रीनिवासचा वेग कमी होत असावा.

उसेन बोल्टने ऑलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्णपदकं मिळवली आहेत. १०० मीटर आणि २०० मीटर अंतर सर्वात वेगाने धावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. बोल्टने १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात तर २०० मीटर अंतर १९.१९ सेकंदात पार केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here