नवी दिल्ली: पाकिस्तान बोर्डाला एक मोठा धक्का बसला आहे. देशात पुन्हा क्रिकेट सामने सुरू करण्याचे प्रयत्न करणाऱ्या पाक बोर्डाला एका देशाने सामने खेळण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तानमध्ये १० वर्षापूर्वी श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे सर्वच संघांनी पाकमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर १० वर्षांनी प्रथम श्रीलंका आणि मग बांगलादेश संघ पाकमध्ये खेळले. पण आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानमध्ये होणारी टी-२० मालिका स्थगित केली आहे.

वाचा-
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पुढील महिन्यात भारत दौरा आहे. खेळाडूंवर वर्कलोड अधिक असून यामुळे हा दौरा स्थगित करत असल्याचे आफ्रिकेच्या बोर्डाने म्हटले आहे. या दौऱ्यासंदर्भात पुढील तारीख नंतर ठरवली जाणार असल्याचे समजते.

आफ्रिकेचा संघ १२ ते १८ मार्च दरम्यान भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. पाकिस्तान दौऱ्यावर तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार होती. पण खेळाडूंवरील वर्कलोडचे कारण देत आफ्रिकेने पाक दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. आफ्रिका सध्या इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. त्याआधी चार कसोटी आणि तीन वनडे सामने झाले आहेत.

वाचा-
इंग्लंड दौऱ्यानंतर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रत्येकी तीन वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा दौरा ७ मार्चपासून सुरू होईल. त्यानंतर भारताच्या दौऱ्यावर येण्यासाठी खेळाडूंकडे एक आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल.

आयपीएलचा १३वा हंगाम देखील २९ मार्चपासून सुरू होत आहे. दोन आठवड्यात आणखी सामने खेळणे खेळाडूंसाठी त्रासदायक असेल, असे बोर्डाचे म्हणणे आहे.

वाचा-
खर तर आफ्रिकेचा संघ इतकाही बिझी नाही. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संघाने फार सामने खेळले नाहीत. आफ्रिकेने सर्व मिळून १३ सामने खेळले आहेत. याकाळात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत आफ्रिका १०व्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
पहिली वनडे-१२ मार्च, धर्मशाला
दुसरी वनडे- १५ मार्च, लखनऊ
तिसरी वनडे- १८ मार्च, कोलकाता

(सर्व सामने दुपारी १.३० वाजता सुरू होतील)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here