दुसऱ्या टी-२० सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४०६ धावांचा पाऊस पाडला. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने २० षटकात ७ बाद २०४ धावा केल्या. उत्तरादाखल आफ्रिकेला २० षटकात ७ बाद २०२ धावा करता आल्या.
वाचा-
या सामन्यात इंग्लंड आणि आफ्रिकेच्या दोघा खेळाडूंनी मिळून धमाकेदार बॅटिंग केली. इंग्लंडचा अष्ठपैलू मोइन अली आणि आफ्रिकेचा कर्णधार डी कॉक यांनी दोघांनी शानदार कामगिरी केली. अलीने ११ चेंडूत ३९ धावा तर डी कॉकने २२ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. अलीने ४ षटकार तर डी कॉकने ८ षटकार खेचले.
३३ चेंडूत १०४ धावा
या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या संघाकडून शानदार खेळ केला. अलीने ११ तर डी कॉकने २२ चेंडू खेळले. दोघांनी ३३ चेंडूत १०४ धावांचा पाऊस पाडला.
अंतिम षटकात आफ्रिकेला ६ चेंडूत १५ धावा हव्या होत्या. पण या षटकात त्यांच्या दोन विकेट पडल्या आणि १२ धावा करता आल्या.
वाचा-
याआधी पहिला टी-२० सामना देखील असाच थरारक झाला होता. तेव्हा इंग्लंडला ६ चेंडूत ७ धावा हव्या होत्या. पण त्यांनी अखेरच्या षटकात तीन विकेट गमावल्या आणि ५ धावा केल्या. दोन्ही संघांमधील तिसरा आणि अखेरचा सामना १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times