तिरुवनंतपूरम: भारतात क्रिकेट चाहत्यांची संख्या सर्वाधिक असली तरी फुटबॉल चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारत फार आघाडीवर नाही. असे असेल तरी देशात शालेय स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात फुटबॉलचे सामने होत असतात. अशाच एका सामन्यातील गोलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-

केरळमधील एका १० वर्षाच्या फुटबॉलपटूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याने झीरो अँगलने किक मारून अफलातून गोल केला. पाचवीत शिकणाऱ्या दानीने मारलेला चेंडू हवेत वळाला आणि गोलपोस्टमध्ये गेला.

वाचा-
ऑल केरला किड्स फुटबॉल टुर्नामेंटच्या फायनलमध्ये दानीने ही कामगिरी केली. दानीने किक मारलेला चेंडू हवेत वळाला आणि गोल झाला. विरोधी संघाच्या गोलकीपरला चेंडू अडवण्याची संधीच मिळाली नाही. हा व्हिडिओ भारताचा दिग्गज स्ट्रायकर आयएम विजयन याने सोशल मीडियावर पोस्ट केला.

वाचा-

दानीने या सामन्यात फक्त हा अफलातून गोल केला नाही तर त्याने हॅटट्रिक देखील केली. विजयनच्या आधी दानीची आई नोव्हिया अशरफ यांनी हा व्हिडिओ ९ फेब्रुवारी रोजी फेसबुकवर अपलोड केला होता. संपूर्ण स्पर्धेत दानीने १३ गोल केले. त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार मिळाला.

वाचा-

सोशल मीडियावर अनेक युझर्स दानीचे कौतुक करत आहेत. काहींनी जगातील अव्वल संघ असलेल्या बार्सिलोना, मँनचेस्टर युनायडेट आणि प्रीमियर लीग यांना टॅग करून दानीला प्रशिक्षण देण्याची विनंती केली आहे. काहींनी तर क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना देखील टॅग केले आहे.

वाचा-
दानीमध्ये भविष्यातील आणि दिसत असल्याचे मत काही युझर्सनी व्यक्त केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here