सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेला तिसरा टी-२० सामना देखील थरारक झाला. प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेने इंग्लडसमोर २२३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. इंग्लंडने देखील कर्णधार इयान मोर्गनच्या वादळी खेळीच्या जोरावर पाच चेंडू राखून विजय मिळवला.

आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ बाद २२२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडकडून जोस बटलर, जॉनी बेयरस्टो यांनी अनुक्रमे ५७ आणि ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. याशिवाय कर्णधार मॉर्गन याने देखील विक्रमी अर्धशतकी खेळी केली. त्याने फक्त २२ चेंडूत ७ षटकारांसह नाबाद ५७ धावा केल्या आणि संघाला ५ विकेटनी विजय मिळवला. या खेळीत मॉर्गनचा स्ट्राइक रेट २५९.०८ इतका होता. या विजयासह इंग्लंडने आफ्रिकेविरुद्धची ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

मॉर्गनने या सामन्यात २१ चेंडूत ५० धावा केल्या. टी-२०मधील ही चौथ्या क्रमांकाची तर इंग्लंडकडून सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी आहे. याआधी २०१९ मध्ये नेपियर येथे त्याने न्यूझीलंडविरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक केले होते.

टी-२०मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने २०१५ मध्ये आफ्रिकेविरुद्ध १७ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याने १९ चेंडूत अर्धशतक केले होते. तर तिसऱ्या स्थानावर पुन्हा ख्रिस गेलच असून त्याने २० चेंडूत अर्धशतक केले.

तिसऱ्या टी-२० सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४४८ धावा केल्या. दोन्ही संघातील पहिले दोन्ही सामने थरारक झाले होते. पहिल्या सामन्यात इंग्लंडने २ धावांनी तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने एक धावाने विजय मिळवला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here