नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत बांगलादेशने भारताचा पराभव करत विजेतपद मिळवले. अंतिम सामन्यात विजयानंतर बांगलादेशने केलेल्या जल्लोषामुळे मैदानात राडा झाला. या प्रकरणी आयसीसीने बांगलादेशच्या तिघा तर भारताच्या दोघा खेळाडूंवर कारवाई केली.

भारताविरुद्ध अंतिम सामन्यात बांगलादेशने केलेल्या शानदार खेळीपेक्षा त्यांनी केलेल्या डर्टी जल्लोषाची चर्चा अधिक झाली. वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्याला आता एक आठवडा झाला असून दोन्ही संघातील खेळाडूंच्या वादाचे खरे कारण समोर आले आहे.

वाचा-
बांगलादेशचा स्टार खेळाडू शोरिफुल इस्लाम याने सांगितले की, आम्हाला भारतीय संघाला याची जाणीव करून द्यायची होती की, जेव्हा विजय संघ पराभव झालेल्या संघाला चिढवतो, तेव्हा त्यांना काय वाटते.

अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतावर ३ विकेटनी विजय मिळवला. त्यानंतर अतिशय चुकीच्या पद्धतीने खेळाडूंनी विजयाचा जल्लोष साजरा केला. जल्लोष करत असताना बांगलादेश आणि भारतीय खेळाडू यांच्यात धक्काबुक्की देखील झाली. सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली याने या घटनेवर माफी देखील मागितली होती. तर भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने या जल्लोषाला डर्टी म्हटले होते.

डेली स्टार या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इस्लाम त्या जल्लोषाचे कारण सांगितले. भारताने बांगलादेशविरुद्ध दोन वेळा मोठा विजय मिळवला होता. तेव्हा त्यांनी अशाच प्रकारचा जल्लोष केला होता. भारताने बांगलादेशचा आशिया कप सेमीफायनल (२०१८) तर २०१९च्या आशिया कम फायनलमध्ये पराभव केला होता. मी सांगू शकत नाही ते दोन पराभव कसे वाटतात, असे इस्लाम म्हणाला.

प्रकरणाची दखल आयसीसीने भारताचा आकाश सिंह आणि रवी बिश्नोई तर बांगलादेशच्या मोहम्मद तौहीद, शमीम हुसैन आणि रकीबुल हसन या पाच खेळाडूंना शिक्षा केली होती.

आयसीसी आकाश सिंहला आठ निलंबन गुण आणि ६ नकारात्मक गुण दिले आहेत. रवी बिश्नोईला ५ निलंबन गुण तर ५ नकारात्मक गुण दिले आहेत. बांगलादेशच्या तौहीदला १० निलंबन गुण आणि ६ नकारात्मक, शमीमला आठ निलंबन गुण तर हसनला ५ निलंबन गुण आणि ५ नकारात्मक गुण दिले आहेत. हे नकारात्मक गुण आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी देखील लागू होणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here