जर एबी डिव्हिलियर्स स्पर्धेसाठी उपलब्ध असेल तर त्याचा संघात विचार होऊ शकतो. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना ५ विकेटनी आणि मालिका २-१ हरल्यानंतर बाऊचरने हे वक्तव्य केले. याआधी एबीने निवृत्तीमागे घेत पुन्हा एकदा आफ्रिकेकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
वाचा-
एबी डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो विविध लीग स्पर्धेत खेळत होता. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये त्याने आफ्रिकेकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण संघ व्यवस्थापनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. तेव्हा बोर्डाने सांगितल्याप्रमाणे एबीने कमीत कमी दोन वनडे सामने खेळले नव्हते. आता मात्र बाऊचरने आम्ही एबीला अशी कोणतीही अट घालणार नसल्याचे सांगितले.
वाचा-
आम्हाला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी दमदार संघ पाठवायचा आहे. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा अंहकार मध्ये येणार नाही. एबीने माध्यमांसमोर सार्वजनिकपणे आफ्रिकेकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी स्वत: त्याच्याशी चर्चा करतोय असे बाऊचरने सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times