नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी एक मोठा धक्का बसला आहे. संघातील धडाकेबाज फलंदाज फाफ डू प्लेसीने कसोटी, वनडे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. डू प्लेसीसने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी तो संघाकडून खेळणार आहे.

डू प्लेसीसने राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने देखील दुजोरा दिला आहे. नव्या पिढीतील खेळाडूला कर्णधारपदासाठी संधी दिली पाहिजे म्हणून मी राजीनामा देत आहे. संघ डी कॉकच्या नेतृत्वाखाली चांगील कामगिरी करत असल्याचे असे ३५ वर्षीय डू प्लेसीने म्हटले आहे.

वाचा-
संघात फलंदाज म्हणून आणि एक सिनिअर खेळाडू म्हणून यापुढेही योगदान देणार असल्याचे डू प्लेसीने म्हटले आहे. नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करणे आणि संघ नियोजनामध्ये या पुढे माझा सहभाग असेल. माझ्या आयुष्यातील सन्मानाची गोष्ट आहे की मला देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आफ्रिकन क्रिकेटने एका नव्या युगात प्रवेश केला आहे. नवे नेतृत्व, नवे खेळाडू, नवी आव्हाने आणि नवी रणनीतीने संघाला खेळावे लागणार आहे. संघातील एक खेळाडू म्हणून मला खेळण्याची इच्छा असल्याचे डू प्लेसीने सांगितले.

वाचा-

वाचा-
डू प्लेसीला नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेत विकेटकीपर डी कॉकने संघाचे नेतृत्व केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here