वाचा-
निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि समितीमधील सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ संपल्यामुळे बीसीसीआयने अर्ज मागवले होते. बीसीसीआयकडे आलेल्या अर्जातून चार जणांना शॉटलिस्ट करण्यात आले आहे. आगरकर, प्रसाद, शिवरामकृष्णन आणि चौहान यांची सीएसी मुलाखत घेईल. क्रिकेट अॅडव्हायझरी कमिटीमध्ये मदन लाल, आरपी सिंह आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे.
वाचा-
पुढील १० दिवसात मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत नव्या प्रमुखाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्या प्रमुखाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करावी लागणार आहे. आफ्रिकेविरुद्धची मालिका १२ मार्चपासून सुरू होईल.
वाचा-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यांनी १९८३ ते १९८६ या काळात ९ कसोटी तर १९८५ ते १९८७ या काळात १६ वनडे सामने खेळले आहेत. लक्ष्मण यांना वेंकटेश प्रसाद आणि अजित आगरकर यांची टक्कर असले.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times