नवी दिल्ली: पाकिस्तानचे नेते अनेक वेळा सोशल मीडियावर पोस्ट करताना मोठी चूक करतात आणि जगभरात तमाशा करून घेतात. अशीच एक मोठी चूक केली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी आणि आता ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

वाचा-
इम्रान खान यांनी सोशल मीडियावरून भारताचा पराभव करून कबड्डी वर्ल्ड कपचे जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना त्यांनी भारताचे नाव लिहले. पण प्रत्यक्षात भारताने अधिकृतपणे कोणताही संघ पाठवला नव्हता. इतक नव्हे तर ही स्पर्धा देखील अधिकृत नव्हती असे समोर आले आहे. आता याच गोष्टीमुळे इम्रान खान ट्रोल होत आहेत.

वाचा-

रविवारी पाकिस्तानच्या लाहोरमधील पंजाब स्टेडियममध्ये कबड्डीचा सामना झाला. कथित वर्ल्ड कप कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा ४३-४१ असा पराभव केला आणि विजेतेपद मिळवले. या विजयी संघाला इम्रान खान यांनी शुभेच्छा दिल्या. पण ज्या भारतीय संघाचा पाकिस्तानने पराभव केला तो संघ अधिकृतपणे भारताचा नव्हता. भारत सरकार अथवा कबड्डी फेडेरेशन ऑफ इंडियाची परवानगी न घेता ४५ जण वाघा बॉर्डर मार्गे पाकिस्तानमध्ये गेले होते आणि त्यांनी हा सामना खेळला होता.

वाचा-
कबड्डी फेडेरेशन ऑफ इंडियाने पाकिस्तानला भारताने कोणताही संघ पाठवला नाही आणि ज्या संघाविरुद्ध सामने तुम्ही खेळणार आहात त्यांचा उल्लेख भारत असा करू नये तसेच तिरंगा देखील वापरू नये असे सांगितले होते. क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी देखील गेल्या आठवड्यात कबड्डी संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले होते.

वाचा-

इतकच नव्हे तर जागतीक कबड्डी फेडरेशनने गेल्या सोमवारी पाकिस्तानात सुरू असलेली स्पर्धा अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले होते. भारतातून जे ४५ जण पाकिस्तानमध्ये गेले होते त्यांची चौकशी केली जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here