वाचा-
सराव सामन्यात मोहम्मद शमीने तीन तर बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आर अश्विनने एक गडी बाद केला. सोशल मीडियावर बुमराहने घेतलेल्या एका विकेटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
वाचा-
यॉर्कर किंग अशी बुमराहची ओळख आहे. पण या व्हिडिओत त्याने चेंडू बाहेरच्या दिशेने आत वळवला आणि बोल्ड घेतली. बुमराहचा चेंडू कधी आला आणि बोल्ड झाली हे फलंदाजाला कळाले देखील नाही. फलंदाज फिन अॅलन हा चेंडू पाहून हैराण झाला. बाहेर जाणारा चेंडू अचानक आत कसा आला, हे अॅलनला कळाले देखील नाही. बुमराहचा चेंडू स्विग होईल याचा त्याने विचारच केला नाही.
वाचा-
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत सर्व बाद २६३ धावा केल्या. भारताकडून हनुमा विराहीने १०१ तर पुजाराने ९३ धावा केल्या. न्यूझीलंड अ संघाला पहिल्या डावात २३५ धावाच करता आल्या. तर दुसऱ्या डावात भारताने ४ बाद २५२ धावांपर्यंत मजल मारली. हा सराव सामना ड्रॉ झाला असला तरी भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी पातळीवर शानदार कामगिरी केली.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times