वाचा-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.
वाचा-
कसोटी मालिका वेळापत्रक
>> पहिली कसोटी: २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन
>> दुसरी कसोटी: २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राइस्टचर्च
(दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार पहाटे ४.०० वाजता सुरू होणार)
वाचा-
दोन्ही संघा दरम्यान आतापर्यंत २१ कसोटी मालिका झाल्या आहेत. यापैकी ११ मालिका भारताने जिंकल्या आहेत तर पाच मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
वाचा-
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात ट्रेंट बोल्टचा समावेश करण्यात आला आहे. बोल्टला बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो भारताविरुद्धची वनडे आणि टी-२० मालिका खेळू शकला नाही बोल्टमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाची धार वाढली आहे.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times