फोटोशेअरिंगसाठी लोकप्रिय असलेल्या इस्टाग्रामवर विराटच्या फॉलोअर्सची संख्या ५ कोटी इतकी झाली आहे. इंस्टाग्रामवर ५ कोटी फॉलोअर्स असणारा विराट हा पहिला भारतीय ठरला आहे. क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक सामन्यात विक्रम करणाऱ्या विराटने आता सोशळ मीडियावर देखील सर्वोच्च स्थान मिळवले आहे. विराटच्या फॉलोअर्सची संख्या इतकी आहे की त्याच्या आसपास देखील कोणी नाही.
वाचा-
इस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ३ कोटी ४५ इतके फॉलोअर्स आहेत.
विराटने इस्टाग्रामवर आतापर्यंत ९३० पोस्ट केल्या आहेत. तो स्वत: १४८ जणांना फॉलो करतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे १ कोटी ७५ लाख इतके फॉलोअर्स आहेत. तर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचे १४ कोटी इतके फॉलोअर्स आहेत.
भारताचा विचार केल्यास विराटनंतर प्रियांका चोप्राचा क्रमांक लागतो. तिचे ४ कोटी इतके फॉलोअर्स आहेत. तिसऱ्या स्थानावर दीपिका पादुकोन असून तिचे ४ कोटी ४१ लाख फॉलोअर्स आहेत. गेल्या वर्षी कोहलीने महेंद्र सिंह धोनीला मागे टाकत सर्वोत यशस्वी कर्णधाराचा मान मिळवला होता. सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून भारतीय संघ येत्या २१ फेब्रुवारीपासून दोन सामन्यांची कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times