बर्लिन: मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुला रोवला गेला आहे. भारतीय क्रिकेट संघाने २०११ साली वानखेडे मैदानावर श्रीलंकेचा पराभव करून आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या फोटोला गेल्या २० वर्षातील सर्वोत्कृष्ठ क्रीडा क्षणाचा पुरस्कार मिळाला आहे. क्रिकेट मैदानात अनेक पुरस्कार आणि चषक उंचावणाऱ्या सचिनने निवृत्तीनंतर साडेपाच वर्षांनी आणखी एक मोठा सन्मान मिळवला आहे.

सोमवारी रात्री बर्लिनमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर () याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताने २०११मध्ये आयसीसी वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या क्षणाला सर्वोत्कृष्ठ क्रीडा लॉरेन्स पुरस्कार () मिळाला आहे.

सचिन तेंडुलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला ” असे शिर्षक देण्यात आले होते. नऊ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने त्याच्या सहाव्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच चषक उंचावला होता. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत ‘लॅप ऑफ ऑनर’ दिला होता. अनेक वर्ष देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनला तेव्हा आश्रू रोखता आले नव्हते.

काल (१७ फेब्रुवारी) बर्लिन येथे सोहळा पार पडला. तेव्हा सचिनला हा पुरस्कार देण्यात आला. लॉरेन्स अकादमीचा सदस्य आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने सचिन तेंडुलकर संदर्भातील या क्षणाला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले होते.

ऑस्ट्रेलियाने जिंकला होता पुरस्कार

ऑस्ट्रेलियाच्या संघाने २००२मध्ये लॉरेन्स अकादमीचा पुरस्कार जिंकला होता. हा आमच्यासाठी सर्वात शानदार खेळ आहे. लॉरेन्स पुरस्कारासाठी नामांकन मिळणे ही फार अवघड गोष्ट असते. भारतीय संघाने २०११मध्ये वर्ल्ड कप जिंकणे ही शानदार अशी कामगिरी होती. आम्ही २००२मध्ये सर्वोत्तम संघाचा लॉरेन्स पुरस्कार मिळवला होता तो क्षण देखील असाच होता, असे वॉने म्हणाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

  1. Very interesting information!Perfect just what I was searching for! “If you could choose one characteristic that would get you through life, choose a sense of humor.” by Jennifer Jones.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here