बर्लिन: भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांच्या प्रभावाखाली सध्या जागतिक आहे. जर क्रिकेट जगभरात पोहोचवायचे असेल आणि त्याला लोकप्रियता मिळवून द्यायची असेल तर या तीन देशांनी त्यांच्या कमाईचा हिस्सा अन्य देशाना दिला पाहिजे, असे परखड मत ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार याने व्यक्त केले आहे.

जर्मनीची राजधानी बर्लिन येथे सोहळ्यासाठी आले असता वॉने टाइम्स ऑफ इंडियाशी खास बातचीत केली. तेव्हा क्रिकेट विश्वातील अनेक गोष्टींवर वॉने आपली मते व्यक्त केली.

वाचा-
जर तुमच्याकडे तीन मजबूत देश असतील तर याला काहीच अर्थ नाही. आपल्याला झिम्बाब्वे, आयर्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश सारख्या देशांना पुढे आणले पाहिजे. या देशांना देखील पैशांची गरज आहे. मला वाटते की हा एक व्यवसाय आहे आणि बिग ३ अन्य देशांपेक्षा अधिक हिस्सा मागत आहेत. पण त्यांना क्रिकेट जिवंत रहावे आणि प्रगती करावे असे वाटत असेल तर दुसऱ्या देशांना प्रगतीसाठी शेअर करावे लागले.

भारत की ऑस्ट्रेलिया

या वर्षाच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच फेव्हरेट संघ असेल. त्यांना खेळपट्टी अधिक चांगल्या पद्धतीने माहित आहे. या दौऱ्यात डे-नाईट कसोटी सामने देखील होतील. हा प्रकार भारतासाठी नवा आहे. पण विराट कोहलीला आव्हान स्विकारण्यास आवडते ही चांगली बाब असल्याचे मी मानतो.

वाचा-
जर तुम्हाला सर्वोत्तम क्रिकेट संघ म्हणून नाव कमवायचे असेल तर बाहेरच्या देशात विजय मिळावा लागले. भारताने गेल्यावेळी २-१ने मालिका जिंकली होती. या विजयाचे श्रेय भारताचेच आहे. पण सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणतीच कमतरता नाही. त्यामुळे मालिका शानदारच होईल असे वॉ म्हणाला.

डे-नाईट कसोटी टिकणार का?
डे-नाईट कसोटी एक शानदार प्रकार आहे. अशा प्रकारचा कसोटी सामना पाहणे एक अद्भुत असते. ऑस्ट्रेलियातील डे-नाईट सामने तुम्ही कधीच विसरू शकत नाही. या पिढीसाठी हे एक नव्हे आव्हान आहे. भारत येथे डे-नाईट कसोटी सामने खेळण्यास तयार आहे याचा मला आनंद असल्याचे वॉने सांगितले.

अशा प्रकारच्या कसोटीमध्ये गोलंदाजांना अधिक संधी आहे. रात्रीच्या वेळी परिस्थीती बदललेली असते. तेव्हा विकेट न गमावता खेळावे लागले. जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर तुम्हाला आक्रमक खेळ करावा लागले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडे शानदार गोलंदाज आहेत. पण प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज देखील घातक आहेत. दोन्ही संघात असे गोलंदाज आहेत जे प्रत्येकी २० विकेट घेऊ शकतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here