लंडन: चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात येत्या काही काळात नव्या स्पर्धा आयोजित करणार आहे. जागतिक स्तरावर काही नव्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

आयसीसी २०२३ ते २०३१ या कालावाधीत आणि वनडे इंटरनॅशनल चॅम्पियन्स कप स्पर्धांचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. टी-२० स्पर्धेत १० संघ असतील तर एकूण ४८ सामने होतील. इंग्लंड आणि वेल्स येथे २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणे प्रत्येक संघाच्या एकमेकांविरुद्ध लढती होतील. आयसीसीच्या या योजनेनुसार टी-२० चॅम्पियन्स कप २०२४ आणि २०२८ मध्ये तर २०२५ आणि २०२९ मध्ये आयोजित करण्याचा विचार आहे. याशिवाय सध्या होत असलेले दोन वर्ल्ड कप स्पर्धा होतीलच.

वाचा-
आयसीसीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या नव्या स्पर्धांशिवाय टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये तर दुसरा २०३०मध्ये होईल. तर वनडे वर्ल्ड कप २०२७ आणि २०३१ मध्ये खेळवला जाईल.

वाचा-
आयसीसीच्या या योजनेनुसार जर स्पर्धा झाल्या तर जवळ जवळ प्रत्येक वर्षी एक मोठी स्पर्धा होईल. याशिवाय कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू राहिलच. या स्पर्धेसाठीची फायनल २०२१ मध्ये खेळवली जाईल. ५० षटकांच्या वनडे स्पर्धेप्रमाणेच चॅम्पियन्स कप तर सध्या टी-२० वर्ल्ड कप प्रमाणे टी-२० चॅम्पियन्स कप आयोजित केला जाईल.

वाचा-
या स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी आयसीसीने पूर्ण सदस्य असलेल्या देशांना १५ मार्चपर्यंत बोली लावण्यास सांगितले आहे.

अर्थात आयसीसीच्या या नव्या स्पर्धांच्या आयोजनाला काही देशातील क्रिकेट बोर्डांचा विरोध होऊ शकतो. यात बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डांचा समावेश असू शकतो. हे तिन्ही बोर्ड द्विपक्षीय स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली चार देशांची मालिका खेळवण्याचा प्लॅन करत आहेत. ज्यामुळे या बोर्डांना फायदा होईल. पण आयसीसीच्या स्पर्धांमुळे आयसीसीला अधिक फायदा होईल. त्यामुळेच काही बोर्ड त्याला विरोध करू शकतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here