मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर याला देऊन गौरवण्यात आले. गेल्या २० वर्षात प्रथमच हा पुरस्कार एखाद्याला मिळाला आहे. २०११च्या आयसीसी वर्ल्ड कपच्या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या क्षणासाठी सचिनला हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर सचिनने सोशल मीडियावरून आभार मानले आहेत.

वाचा-
इतक प्रेम आणि समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मी हा पुरस्कार भारत, भारतीय संघातील खेळाडू, चाहते यांच्यासह भारत आणि जगभरातील भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना समर्पित करत आहे.

वाचा-

सोमवारी रात्री बर्लिनमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर () याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताने २०११मध्ये आयसीसी वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या क्षणाला सर्वोत्कृष्ठ क्रीडा लॉरेन्स पुरस्कार () मिळाला आहे.

वाचा-
सचिन तेंडुलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला ‘कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन’ असे शिर्षक देण्यात आले होते. नऊ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने त्याच्या सहाव्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच चषक उंचावला होता. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत ‘लॅप ऑफ ऑनर’ दिला होता. अनेक वर्ष देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनला तेव्हा आश्रू रोखता आले नव्हते.

वाचा-
सचिनला हा पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, समालोचक हर्षा भोगले, क्रिकेटपटू कुलदीप यादव यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here