वेस्ट इंडिज संघातील जलद गोलंदाज याच्या गाडीला भीषण अपघात झाला. अपघात झाला तेव्हा थॉमस स्वत: गाडी चालवत होता. आयर्लंडविरुद्ध थॉमसने गेल्या महिन्यात अखेरची वनडे मॅच खेळली होती. रविवारी जमैकाच्या हायवेवर त्याच्या गाडीला अपघात झाला.
वाचा-
थॉमसच्या ऑडी कार दुसऱ्या एका गाडीशी धडकली. ही धडक इतकी भीषण होती की थॉमसची गाडी पलटी झाली. अपघातानंतर थॉमसला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जमैकाच्या हायवे २०००च्या ओल्ड हार्बर येथे हा अपघात झाला. रुग्णालयातील उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आल्याचे थॉमसच्या प्रवक्त्याने सांगितले.
वाचा-
थॉमसने गेल्याच महिन्यात आयर्लंडविरुद्ध वनडे मॅच खेळली होती. पण त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. वेस्ट इंडिजकडून थॉमसने २० वनडे, १० टी-२० सामने खेळले असून यात त्याने अनुक्रमे २७ आणि ९ विकेट घेतल्या आहेत.
वाचा-
येत्या २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत थॉमस राजस्थान रॉयर्ल्स संघाचा सदस्य आहे. थॉमसच्या अपघातामुळे राजस्थान रॉयल्स संघाची डोकेदुखी वाढली आहे. राजस्थान संघाने ५० लाख बेस प्राइस असलेल्या थॉमसला १.५ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times