नवी दिल्ली: भारतीय संघातील ‘द वॉल’ अशी ओळख असलेला माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या नवी पिढी घडवत आहे. राहुलकडे बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी सोपवली आहे. राहुलने क्रिकेट खेळताना अनेक विक्रम नोंदवले आता द्रविडचा मुलगा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत धडाकेबाज कामगिरी करत आहे.

वाचा-
राहुल द्रविडचा मुलगा समितने १४ वर्षाखालील वनडे मालिकेत धमाकेदार कामगिरी केली. समितने ग्रुप वनडे मालिकेत दोन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम केला. केवळ १४ वर्षाच्या समित द्रविडने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. सोमवारी त्याने दोन महिन्यांच्या अंतराने दुसरे झळकावले. तो सध्या १४ वर्षाखालील बीटीआर शिल्ड स्पर्धेत माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलकडून खेळत आहे. श्री कुमारन संघाविरुद्ध त्याने वनडे क्रिकेटमधील दुसरे द्विशतक झळकावले.

वाचा-

पाच सामन्यात ३ शतकी खेळी
समित द्रविडने ३३ चौकार आणि षटकारांच्या मदतीने २०४ धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीमुळे संघाने ३ बाद ३७७ धावांचा डोंगर उभा केला. समितने फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीत चमक दाखवली. त्याने २ विकेट घेतल्या. या सामन्यात माल्या आदिती स्कूलने २६७ धावांनी विजय मिळवला. ३७८ धावांचा पाठलाग करताना श्री कुमारन संघाला ११० धावाच करता आल्या.

वाचा-
गेल्या दोन महिन्यांच्या काळात समित द्रविडने पाच वनडे सामन्यात ६८१ धावा केल्या आहेत. यात दोन द्विशतके, एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. २७७च्या सरासरीने धावा करणाऱ्या समितने ७ विकेट देखील घेतल्या आहेत.

समितने पहिले द्विशतक १४४ चेंडूत केले होते. तेव्हा त्याने २११ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या द्विशतकासाठी त्याने १४६ चेंडू घेतले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here