अहमदाबाद येथील २०१५ मध्ये पाडण्यात आले आणि नव्याने बांधण्यास सुरूवात केली. जुन्या मैदानात ५३ हजार प्रेक्षक सामना पाहू शकत होते. आता या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटवर या मैदानाचा एरियल व्ह्यू शे्अर केला आहे.
वाचा-
गुजरात असोसिएशनद्वारे बांधण्यात आलेले हे मैदान जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. सध्या प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता मेलबर्न मैदान हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम आहे. मेलबर्न मैदानावर एक लाख प्रेक्षक सामना पाहू शकतात.
वाचा-
या मैदानाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिले जात आहे. अमित शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना स्टेडियमचे काम सुरू करण्यात होते. यासाठी ७०० कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.
लार्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीने नव्या स्टेडियमची निर्मिती केली आहे. कंपनीने निर्मितीचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण केले आहे. मैदानात खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा दिल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times