परदेशात खेळण्यास परवानगी का नाही?
आयपीएलमधील ३ संघ असे आहेत जे गेल्या ८ वर्षांपासून सातत्याने परदेशात खेळण्याची परवानगी मागत आहेत. जेव्हा ऑफ सीजन असतो म्हणजे आयपीएल स्पर्धा नसते तेव्हा मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघांनी परदेशात खेळण्याची परवानगी मागितली आहे. पण अद्याप त्याला होकार देण्यात आलेला नाही.
वाचा-
परदेशात खेळल्यामुळे आयपीएलचा भारता बाहेर विस्तार होईल. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर आणि अन्य क्रिकेट न खेळणाऱ्या देशात याचा फायदा होईल, असे या संघांचे मत आहे.
स्पॉन्सर्सची अडचण
आयपीएलमधील जवळ जवळ प्रत्येक दुसरा सामना रात्री १२ वाजता संपणार आहे. अशा परिस्थितीत स्पॉन्सर्सची तक्रार आहे की त्यांना अधिक व्हिजिबिलिटी नाही मिळणार. जर आयपीएल व्यवस्थापन सामना लवकर सुरू करू शकत नसेल तर ओव्हर रेटचा नियम कठोर करू शकते. सामना जर रात्री साडे अकराला संपला तरी थोडा दिलासा मिळू शकतो. रविवारी सर्वसाधारण लोक ११ वाजता झोपतात. कारण दुसऱ्या दिवशी त्यांना कामावर जायचे असते. त्यामुळे सामना लवकर कसा संपवायचा हा मोठा प्रश्न आहे.
वाचा-
जनहित याचिकेची डोकेदुखी
आयपीएल संदर्भात देशातील कोणत्याही कोर्टात दाखल होणाऱ्या जनहित याचिका या नेहमी चर्चेत असतात. हे प्रकार थांबले पाहिजेत. कोणी उठतो आणि कोर्टात याचिका दाखल करतो. अशा याचिकांना माध्यमांमध्ये प्रसिद्धी देखील मिळते. याचा स्पर्धेवर नकारात्मक परिणाम होतो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times