आयपीएलची सुरूवात २००८ मध्ये झाली पण या स्पर्धेत कर्णधार म्हणून एखाद्या खेळाडूने शतक करण्यासाठी २०११ पर्यंत वाट पाहावी लागली. आयपीएलच्या चौथ्या हंगामात एका कर्णधाराने शतक झळकावले आणि ही कामगिरी केली मुंबई इंडियन्सचा कर्णधार याने. त्याआधी भारताकडून या स्पर्धेत मनीष पांडे याने शतक केले होते. तर स्पर्धेतील पहिले शतक करण्याचा मान न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅकुलम याने मिळवला होता.
वाचा-
२०११च्या आयपीएलमध्ये सचिन तेंडुलकरने कोच्ची टस्कर्स केरळा विरुद्धच्या सामन्यात ६६ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या होत्या.
वाचा-
सचिनच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने २० षटकात १८२ धावा केल्या. पण कोच्चीने १९ षटकात विजयाचे लक्ष्य पार केले. सचिनने २००८ ते २०१३ या काळात सहा स्पर्धा खेळल्या. यात त्याने ७८ सामन्यात ३४.८३च्या सरासरीने २ हजार ३३४ धावा केल्या. सचिनच्या आयपीएल करियरमध्ये एक शतक आणि १३ अर्धशतकांचा नोंद आहे. आयपीएलमध्ये सचिनने २९५ चौकार आणि २९ षटकार मारले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times