बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला, भारतीय संघ त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्यास उत्सुक आहे. पृथ्वी शॉ एक शानदार खेळाडू आहे. त्याच्याकडे स्वत:ची शैली आहे. माझ्या मते मयांकने ऑस्ट्रेलियामध्ये जशी कामगिरी केली होती तशीच कामगिरी पृथ्वी सोबत न्यूझीलंडविरुद्ध करेल. मयांक चांगली सलामी देईल.
वाचा-
विराटच्या या विधानावरून पृथ्वी शॉ विदेशात पहिली कसोटी खेळणार हे निश्चित झाले आहे. पृथ्वीने त्याच्या करिअरच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यानंतर बंदीला सामोरे जावे लागले होते. बंदीचा कालावधी संपल्यानंतर पृथ्वीला दुखापतामुळे संघाबाहेर रहावे लागले होते. भारतीय संघाकडून दोन कसोटीत त्याने एक शतक आणि एक अर्धशतकी खेळी केली आहे.
वाचा-
पृथ्वीचा अनुभव कमी आहे पण तोच आमच्या उपयोगी येऊ शकतो. तर मयांक गेल्या अनेक वर्षांपासून धावा करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शिस्त म्हत्त्वाची ठरते, असे विराट म्हणाला.
वाचा-
मयांक आणि पृथ्वी सलामीला येणार हे निश्चित असल्यामुळे न्यूझीलंड अ संघाविरुद्ध एक द्विशतक आणि एक शतक करणाऱ्या गिल याला संधी मिळण्याची शक्यता दिसत नाही. गिल गेल्या अनेक मालिकेपासून भारतीय संघासोबत आहे. पण त्याला अंतिम ११ मध्ये जागा मिळाली नाही. कोहली गिलच्या ऐवजी पृथ्वीला संधी देऊ पाहत आहे ज्याने याआधीच कसोटीत पदार्पण केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times