लाहोर: गेल्या काही वर्षात वनडे आणि टी-२०मुळे वेगवान होत आहे. टी-२०मधील आक्रमक फलंदाजीमुळे वनडेत ३००-३५० धावा देखील मोठे आव्हान वाटत नाही. क्रिकेटमधील हा वेग आणि बदल काही खेळाडूंच्या फलंदाजीमुळे आला आहे. असे तीन खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट खेळाला बदलले. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज याने अशा तीन खेळाडूंची नावे सांगिली आहेत ज्यांनी क्रिकेटला बदलून टाकले.

वाचा-
काही वर्षांपूर्वी फलंदाज जलद गोलंदाजांना फक्त बॅकफूटवर खेळायचे. पण यांनी सर्वांना दाखवून दिले की जलद गोलंदाजांना फ्रंटफूटला देखील खेळता येते. रिचर्ड्स यांनी जलद गोलंदाजांना आक्रमकपणे खेळता येते हे दाखवून दिल्याचे इंझमाम म्हणाला.

वाचा-
क्रिकेटमधील दुसरा बदल केला श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने केला. त्याने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या १५ ओव्हरमध्ये जलद गोलंदाजांवर आक्रमक हल्ला करण्याचे धोरण वापरले. खेळपट्टीवर चालत येत हवेत चेंडू मारणे आणि पहिल्या १५ षटकातील क्षेत्ररक्षणाचा फायदा घेण्याची पद्धत जयसूर्याने आणली आणि क्रिकेटचे स्वरुपच बदलले.

वाचा-

त्यानंतर इंझमामने एबी डिव्हिलियर्सचा उल्लेख केला. आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये जो वेग आला आहे त्याला एबी कारणीभूत आहे. आधी फलंदाज सरळ बॅटने शॉट खेळत असत. पण एबीने पॅडल स्वीप आणि रिव्हर्स स्वीप मारण्यास सुरूवात केली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here