येत्या तीन वर्षात विराट तिनही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर वर्कलोडचा विचार करून किती काळ क्रिकेट खेळायचे हे ठरवणार असल्याचे विराट म्हणाला. क्रिकेट विश्वातील या दिग्गज फलंदाजांची नजर पुढील तीन वर्षात होणाऱ्या दोन टी-२० वर्ल्ड कप आणि एका ५० षटकाच्या वर्ल्ड कपवर असणार आहे. त्यानंतर विराट वनडे, कसोटी आणि टी-२० यापैकी कोणत्या तरी दोन प्रकारात खेळायचे हे ठरवणार आहे.
वाचा-
भारतात २०२१ साली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणार का? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, माझा नजर मोठ्या गोष्टीकडे आहे. पुढील तीन वर्षांसाठी मी स्वत:ला तयार करत आहे. त्यानंतर मी करिअरचा विचार करेन.
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेआधी थकवा आणि वर्कलोड संदर्भात संघ व्यवस्थापनाशी बोलल्याचे विराटने सांगितले. हा विषय मी तुमच्यापासून लपवू शकत नाही. गेल्या आठ वर्षापासून मी प्रत्येक वर्षी जवळ जवळ ३०० दिवस खेळत आहे. यात प्रवास, सराव सत्राचा समावेश आहे. प्रत्येक वेळी मी मैदानात त्याच जोशाने आणि उत्साहाने उतरतो. यामुळे तुमच्यावर प्रचंड दबाव असतो, असे विराट म्हणाला.
वाचा-
३१ वर्षीय विराटने सांगितले की, ठराविक अंतराने ब्रेक घेतल्यामुळे मला त्याचा फायदा झाला. प्रत्येक खेळाडू असा नेहमी विचार करत नाही. पण नेहमी हे शक्य होत नाही. विशेषत: जे खेळाडू तिनही प्रकारचे क्रिकेट खेळतात.
जेव्हा माझे शरीर दबाव सहन करू शकणार नाही किंवा मी ३४ वा ३५ वर्षांचा होईन. तेव्हा निवृत्तीचा विचार करेन. पुढील दोन ते तीन वर्ष कोणतीही अडचण नसल्याचे विराटने सांगितले.
हे देखील वाचा
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times