नवी दिल्ली: भारतीय संघाचा उपकर्णधार आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिका मुकावी लागली. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात त्याला दुखापत झाली होती. आता रोहित पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठीची तयारी करत आहे. रोहितने जिममधील वर्कआउटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वाचा-
आयपीएलच्या दृष्टीने रोहितने जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या २९ मार्चपासून आयपीएलला सुरूवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांचा आहे. रोहितने इस्टाग्रामवर जिममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. २५ सेकंदाच्या या व्हिडिओत रोहित डेड लिफ्ट वर्कआऊट करत आहे.
वाचा-
डेड लिफ्ट वर्कआउटमध्ये कंबर आणि पायावर वजन येते. यामुळे पोटरीचा देखील व्यायाम होतो. या व्हिडिओत रोहित फिट दिसत आहे. आयपीएलच्या आधी रोहितला भारतात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळायचे आहे. रोहित यासाठी स्वत:ला फिट करत आहे.
वाचा-
हे देखील वाचा
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times