इस्लामाबाद: पाकिस्तान क्रिकेटपटू आणि मॅच फिक्सिंग यासंदर्भात अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत. आता पाकिस्तानच्या आणखी एका खेळाडूवर मॅच फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये २० फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू होत आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच पाक बोर्डाने एका खेळाडूला निलंबित केले.

वाचा-
पाकिस्तान बोर्डाने क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळणाऱ्या उमर अकमलच्या ऐवजी अन्य खेळाडूचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. बोर्डाने भ्रष्टाचार विरोधी कलम ४.७१ नुसार अकमल याला निलंबित केले आहे. अकमलवर याआधीच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता आणि त्याची चौकशी सुरू होती. अर्थात त्यावर पीसीबीने कोणतेही भाष्य केले नाही.

वाचा-
कराचीमध्ये उद्या क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायडेट संघांचा पहिला सामना होणार होता. पण त्याआधी पीसीबीने क्वेटा संघाला झटका दिला.

वाचा-
२९ वर्षीय उमर अकमलने पाकिस्तान संघाकडून मार्च २०१९ मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्याने २००९ मध्ये पाकिस्तानकडून १६ कसोटी, १२१ वनडे आणि ८४ टी-२० सामने खेळले आहेत. चांगला क्रिकेटपटू असून ही मेहनत न घेतल्यामुळे अकमल नेहमीच आत-बाहेर राहिला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here