नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात स्पर्धा सुरू होण्यात एक दिवस शिल्लक आहे. सर्व संघ स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करत आहेत. अशातच पाकिस्तानी महिला संघाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत खेळाडू तोंडाने आवाज करत डान्स करत आहेत. हा व्हिडिओ आयसीसीने आणि वर्ल्ड कपने ट्विटर पेजवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये पाकिस्तान संघातील अष्ठपैलू इरम जावेद बॅट हातात पकडून तोंडाने आवाज करत आहे आणि अन्य सहकारी डान्स करत आहेत. आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करता पाकिस्तानी महिला संघ खरोखर रॉकस्टार आहे, असे म्हटले.

वाचा-

पाकिस्तानी चाहते भडकले

पाकिस्तानी महिला संघाचा हा डान्स देशातील चाहत्यांना मात्र काही आवडला नाही. अनेक युझर्सनी त्यावर टीका केली आहे. महिलांना हे काम शोभत नाही. त्यावर असे प्रकार करता. ही डान्स पार्टी आहे की आयसीसी स्पर्धा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे मुलींनो, असे एका युझरने म्हटले आहे.

वाचा-
दुसऱ्या एका युझरने या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठीच्या चियरलिडर्स म्हटले आहे.

एका महिला युझरने प्रत्येक ठिकाणी पंगा करणे गरजेचे असते. ‘मुहल्ले की चुडैल’, अशी प्रतिक्रिया दिली.

वाचा-
तर अन्य एका युझरने किमान थोडी क्रिकेट कसे खेळायचे शिकला असता. बाकी सर्व कामात एक्सपर्ट आहेत या, असा टोला लगावला आहे.

अर्थात पाकिस्तान चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला नसला तरी अनेक भारतीयांनी मात्र पाक संघाला पाठिंबा दिला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here