काही दिवसांपूर्वा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर बुश फायर रीलीफ मॅच खेळवण्यात आली. या सामन्यात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. हा सामना रिकी पॉन्टिंग आणि अॅडम गिलख्रिस्ट यांच्या संघात झाला. सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या याने ९ चेंडूत ३० धावांची आक्रमक खेळी केली.
वाचा-
वॉटसन याने या सामन्यात पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वासीम अक्रमच्या सलग दोन चेंडूवर षटकार मारले.
हा सामना झाल्यानंतर मला खुप वाईट वाटले. अक्रम माझ्यासाठी एक हिरो आहे. मी त्यांचा खेळ पाहत मोठा झालो. एका मदत निधी सामन्यात मी जेव्हा दुसरा षटकार मारला तेव्हा ते चेंडू हवेतून बाहेर जाताना मला खुप वाईट वाटत होते. यासाठी सामना झाल्यानंतर मी अक्रमची वारंवार माफी मागितल्याचे, वॉटसन म्हणाला.
वाचा-
अर्थात वॉटसनच्या या खेळीचा गिलख्रिस्ट संघाला फायदा झाला नाही. पॉन्टिंग संघाने या सामन्यात विजय मिळवला.
वाचा-
शेन वॉटसन उद्यापासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत क्वेटा गॅडिएटर संघाकडून खेळणार आहे. पीएसएलच्या सलग पाचव्या हंगामात वॉटसन खेळत आहे. गेल्या हंगामात क्वेटाला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्याने १२ सामन्यात ४३० धावा केल्या होत्या. यात ४ अर्धशतकांचा समावेश होता.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times