येत्या २४ मे पासून सूरू होणाऱ्या स्पर्धेत फेडरर खेळणार नाही. ३८ वर्षीय फेडररने गुढघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या गुढघ्यांवर ऑपरेशन होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुढघा त्रास देत आहे. माझ्या टीमशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतल्याचे फेडररने म्हटले आहे.
वाचा-
ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्लानंतर मी पुन्हा एकदा कोर्टवर उतरेन. या काळात मी दुबई, इंडियन, बोगोता, मियामी आणि फ्रेंच ओपन स्पर्धेला मुकणार आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार. मी लवकरच पुन्हा एकदा कोर्टवर येण्यास उत्सुक आहे. ग्रास कोर्टवर भेटू, असे फेडररने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
वाचा-
याआधी फेडरर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळला होता. उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने फेडररवर ७-६ (७-१), ६-४, ६-३ अशी मात केली होती. त्यानंतर अंतिम फेरीत जोकोविचने विजेतेपदाला गवसणी घातली होती.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times