नवी दिल्ली: भारतीय संघातील फिरकीपटू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ओझाने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणीच्या तिनही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्वत: ओझाने सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

३३ वर्षीय ओझाने ट्विटवर दोन पानांचे पत्र शेअर केले आहे. ज्यात त्याने माजी कर्णधारांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. माझ्या आयुष्यातील आता पुढील टप्प्याचा प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रेम आणि समर्थन देणारा प्रत्येक व्यक्ती मला नेहमी लक्षात राहिल आणि मला उर्जा देत राहिल, असे त्याने म्हटले.

वाचा-
ओझाने २००८ मध्ये भारतीय वनडे संघात पदार्पण केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने तिनही प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. ओझाने भारतीय संघाकडून २४ कसोटी, १८ वनडे आणि ६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ११३ विकेट घेतल्या आहेत. त्यात एक वेळा १० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. वनडेत ओझाने २१ तर टी-२०त १० विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीचा विचार केल्यास कसोटीत ८९, वनडेत ४६ तर टी-२०त त्याने १० धावा केल्या आहेत.

वाचा-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याची ही योग्य वेळ असल्याचे वाटल्याने त्याने निवृत्ती घेतली. भविष्यात प्रशिक्षक आणि समालोचकाच्या भूमिकेत ओझा दिसू शकेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here