भारताने कालच्या ५ बाद १२२ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. १३२ धावांवर ऋषभ पंत धावबाद झाला. त्यानंतर आर.अश्विन शून्यावर बाद झाला. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे ४६ धावा करून माघारी परतला. जलद गोलंदाज मोहम्मद शमीने २१ धावांची भर टाकली आणि संघाला १५०च्या पुढे नेले.
वाचा-
न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि कायले जॅमिसन यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडची सुरूवात फार समाधानकारक झाली नाही. टॉम लॅथम याला इशांत शर्माने ११ धावांवर बाद करत पहिली विकेट घेतली. त्यानंतर टॉम ब्लंडल याला इशांतने बोल्ड केले. तो ३० धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. ही जोडी फोडण्याचे काम इशांतनेच केले. त्याने १००वी कसोटी खेळणाऱ्या टेलरला ४४ धावांवर बाद केले.
पाहा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times