शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल १०७ धावांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो एगर ठरला. त्याने पाच विकेट घेत हॅट्ट्रिकही नोंदवली. स्वतःच्या गोलंदाजीविषयी सांगतानाच आपण जाडेजाशी बोलून अत्यंत प्रेरित झाल्याचं सांगायलाही एगर विसरला नाही.
आपल्याला जाडेजासारखं खेळायला आवडेलं असंही एगर म्हणाला. ‘जाडेजा माझा जगातला सर्वात आवडता खेळाडू आहे. तो खेळतो तसंच क्रिकेट मलाही खेळायचं आहे. तो खरोखरचा रॉकस्टार आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तो परफेक्ट आहे. जाडेजा फक्त उपस्थित असला तरीही मला आत्मविश्वास मिळाल्यासारखं वाटतं’, असं तो cricket.com.au शी बोलताना म्हणाला.
गोलंदाजीसोबतच रवींद्र जाडेजाच्या फलंदाजीचाही एगर चाहता आहे. तो म्हणाला, ‘ जेव्हा फलंदाजी करतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते आणि क्षेत्ररक्षणातही हा ऊर्जा घेऊन तो येतो.’
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times