वाचा-
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत दोन मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि विकेटकीची जबाबदारी एक कुत्रा पार पाडत आहे. गरेवाल यांनी हा व्हिडिओ शेअर करताना, याच्यासाठी बेस्ट फिल्डरचा अॅवॉर्ड, असे म्हटले आहे.
वाचा-
व्हिडिओत एक जण बॉल टाकतो आणि एक मुलगी शॉट मारते. त्यानंतर कुत्रा तो चेंडू पकडण्यास जातो. चेंडू गोलंदाजाला दिल्यानंतर तो पुन्हा विकेटकीपरची जबाबदारी पार पाडण्यासाठी येतो.
वाचा-
क्रिकेटच्या मैदानावरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण असा व्हिडिओ प्रथमच समोर आला आहे जिथे एक कुत्रा देखील क्रिकेट खेळतोय. सोशल मीडियावर या व्हिडिओवर युझर्स प्रतिक्रिया देत आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times