नवी दिल्ली: वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि देशाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा अष्ठपैलू क्रिकेटपटू याने पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. पाकिस्तानात सुरू असलेल्या पेशावार जाल्मी या संघाचा तो कर्णधार आहे. पाकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट सुरू करण्यात सॅमीचे मोठे योगदान आहे.

PSLच्या पाचव्या हंगामाला नुकतीच सुरूवात झाली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात सॅमी प्रथम खेळला होता. तोपर्यंत पीएसएल स्पर्धेत कोणताही विदेशी खेळाडू खेळण्यास तयार नसे. पीएसएलच्या दुसऱ्या हंगामात त्याने पेशावर संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपद मिळवून दिले. पाकमध्ये २००९ साली श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. तेव्हापासून पाकमध्ये क्रिकेट बंद झाले होते.

वाचा-
पेशावर संघाचे मालक मालिक जावेद यांनी सांगितले, सॅमी हा संघाचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. खुद्द सॅमीने या प्रकरणी त्यांची मदत मागितली होती.

वाचा-
येत्या २३ तारखेला सॅमीला पाकिस्तानचे नागरिकत्व दिले जाणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी सांगितले. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी सॅमीला नागरिकत्व देतील.

वाचा-
सॅमीने वेस्ट इंडिज संघाला २०१४ आणि २०१८ मध्ये टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवून दिले होते. मला पाकिस्तानमध्ये आल्यावर छान वाटले. २०१७ मध्ये देखील मी येथे आलो होते. प्रत्येक देशातील क्रिकेट चाहते त्याच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यास उत्सुक असतो. पाकिस्तानमधील चाहते अनेक वर्ष याला मुकले आहेत, असे सॅमी म्हणाला.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here