शिखरने इस्टाग्रामवर घोड्यावर बसलेला फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तो म्हणतो, कितने बॉलर थे? गब्बर इज बॅक…! शिखरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती.
वाचा-
भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेत शिखरच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो न्यूझीलंड दौऱ्याला मुकला होता. त्याच्या ऐवजी संघात संजू सॅमसन तर वनडे संघात पृथ्वी शॉला संधी दिली होती. दुखापतीतून बाहेर येण्यासाठी शिखर बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता.
दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आशियाई संघासाठी शिखर धवनचे नाव सुचवले होते. याशिवाय विराट कोहली, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचा देखील समावेश होता. आशियाई संघ विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन संघा दरम्यान १८ आणि २१ मार्च रोजी दोन टी-२० सामने होणार आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times