वाचा-
यजमान न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत भारताचा १० विकेटनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताचा हा पहिला पराभव आहे आणि या पराभवाला जबाबदार ठरले फलंदाज. सामना झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला, आम्हाला कल्पना आहे की आम्ही चांगला खेळ केला नाही. पण जर लोकांना एका पराभवामुळे आम्हाला वाईट ठरवायचे असेल आणि राईचा पर्वत करायचा असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. कारण आम्ही तसा विचार करत नाही.
मला समजत नाही की एका पराभवाला असे का पाहिले जात आहे, जणू संघासाठी सर्व जगच संपले आहे. काही लोकांसाठी हा जगाचा शेवट असू शकेल पण आमच्यासाठी नाही. आमच्यासाठी ही एक क्रिकेट मॅच होती. ज्यात भारताचा पराभव झाला. आता आम्हाला या पुढे जायचे आहे आणि चांगली कामगिरी करायची आहे.
वाचा-
घरच्या मैदानावर विजय मिळवायचा असेल तर चांगला खेळ करावा लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर गोष्टी सोप्या नसतात. कारण संघ येतात आणि तुमचा पराभव करतात, असे विराट म्हणाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times