पोर्ट एलिझाबेथ: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने १२ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेने कर्णधार डी कॉकच्या ४७ चेंडूतील ७० धावांच्या जोरावर १५८ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाला २० षटकात ६ बाद १४६ धावा करता आल्या. या सामन्यात फाफ डु प्लेसिस आणि डेव्हिड मिलर यांनी मिळून पकडलेल्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

वाचा-
आफ्रिकेने दिलेल्या १५८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डावात मिचेल मार्शचा कॅच डु प्लेसिस आणि मिलर यांनी मिळून पकडला. या कॅचची नोंद मिलर याच्या नावावर झाली असली तरी त्यात डु प्लेसिसचे योगदान नाकारता येणार नाही.

वाचा-
१८ व्या षटकात मिचेलने आफ्रिकेच्या लुंगी एगिडीच्या चेंडूवर शॉट मारला. चेंडू थेट सीमा रेषेबाहेर जाईल असे दिसत होते. पण डु प्लेसिसने जबरदस्त फिल्डिंग केली आणि चेंडू हवेत उडी मारून सीमा रेषेच्या आत थांबवला. डु प्लेसिसने हवेत उडवलेला चेंडू डेव्हिड मिलरने लॉग ऑफकडून पळत येत उडी मारून पकडला. हा कॅच पाहून सर्वजण हैराण झाले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here