पर्थ: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होत आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत शानदार सुरूवात केली होती. त्यामुळे विजयाची हीच लय पुढे कायम ठेवण्यास संघ उत्सुक असेल. बांगलादेश संघाचा हा पहिलाच सामना आहे.

Live अपडेट- (India Women vs Bangladesh Women)

>> बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करत भारताच्या ६ बाद १४२ धावा
>> १८ षटकात भारताच्या ६ बाद १२९ धावा

>> भारताची सहावी विकेट, दीप्ती शर्मा ११ धावांवर धावबाद

>> भारताची पाचवी विकेट, रिचा घोषला सलमा खातूनने १४ धावांवर बाद केले

>> १४ षटकात भारताच्या ४ बाद ९५ धावा

>> जेमिमा रॉड्रिग्ज ३४ धावांवर धावबाद, भारत ४ बाद ९२
>> १० षटकात भारताच्या ३ बाद ७८ धावा

>> भारताची तिसरी विकेट, कर्णधार हरमनप्रीत कौरला पन्ना घोषने ८ धावांवर केले बाद

>> सात षटकात भारताच्या २ बाद ६१ धावा (जेमिमा-१४*, कौर-५*)

>>
भारताची दुसरी विकेट, शफाली वर्माला (१७ चेंडूत ३९ धावा) पन्ना घोषने केले बाद

> पाच षटकात भारताच्या १ बाद ४७ धावा (शफाली-३३*, जेमिमा रॉड्रिग्ज-११*)

>> आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप: ३ षटकात भारताच्या १ बाद ३४ धावा

>> भारताला पहिला धक्का, तानिया दोन धावा करून बाद; सलमा खातून हिने घेतली विकेट

>> तानिया भाटिया आणि शफाली वर्मा यांनी केली भारतीय डावाला सुरूवात

>> भारतीय संघात एक बदल- स्मृती मानधना ऐवजी ऋचा घोषला संधी

>> बांगलादेशने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here