मुंबई: नेव्ही चिल्ड्रन स्कूलच्या जिया रायने अरबी समुद्रातील १४ किलो मीटर अंतर पार करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला. जियाने १४ किलो मीटर अंतर ३ तास २७ मिनिटात पार केले.

११ वर्षीय जिया आठवीत शिकत असून १५ फेब्रुवारी २०२० रोजी करत अरबी समुद्रातील १४ किलो मीटर अंतर पार केले. जियाने मुंबई जवळच्या एलिफटा बेट ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर ३ तास २७ मिनिटात पार केले. यासह जियाच्या नावावर सर्वात वेगाने हे अंतर पार करण्याचा विक्रम नोंदला गेला.

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने या इव्हेंटचे आयोजन केले होते. सर्वात कमी वयाच्या मुलांच्या वर्गात १४ किलो मीटर अंतर ३ तास २७ मिनिटे ३० सेकंदात पार करण्याचा जियाचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला गेला आहे.

हे अंतर पार करण्यासाठी स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने ४ तास २१ मिनिटे इतकी वेळ दिली होती. पण जियाने ५५ मिनिटे आधीच हे अंतर पार केले.

जियाला लहान वयातच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा त्रास होता. यामुळे जियाची वाढ इतर मुलांच्या तुलनेत धीम्या गतीने होत होती. जियाला वयाच्या दुसऱ्या वर्षी बोलताना अडचणी येत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तिला वॉटर थेरपी देण्यात आली आणि स्विमिंग शिकवण्यात आले. त्यानंतर जियाने स्पर्धात्मक स्विमिंगमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर जियाने मागे वळून पाहिले नाही. आज जियाने विश्व विक्रम स्वत:च्या नावावर केला आणि आई-वडिलांसह शाळेचे नाव मोठे केले. याआधी देखील जियाने अनेक स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली आहेत.

जियाचे पुढील लक्ष्य बेंगळुरू येथे मार्चमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेवर आहे आणि त्यानंतर जुलैमध्ये होणाऱ्या ऑलिंम्पिक स्पर्धेची ती तयारी करत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here