नवी दिल्ली: जगतात अनेक दिग्गज फलंदाज झाले. कोणाला लिटील मास्टर तर कोणाला मास्टर ब्लास्टर म्हटले गेले. पण क्रिकेटमध्ये एकच डॉन झाला आणि आजही एकच डॉन आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून आजही नाव घेतले जाते ते ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज यांचे…

पाहा-
क्रिकेटमध्ये ब्रॅडमन यांनी केलेल्या विक्रमामुळेच त्यांना द डॉन असे म्हटले जात होते. ब्रॅडमन यांनी केलेले विक्रम इतके विशाल होते की अनेक वर्ष त्याच्या जवळपास कोणाला पोहोचता आले नाही. तर काही विक्रम तर आज देखील कायम आहेत. २५ फेब्रुवारी २००१ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी ब्रॅडमन यांचे निधन झाले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी ९९.९४च्या सरासरीने ६ हजार ९९६ धावा केल्या आहेत. ब्रॅडमन यांनी केलेल्या धावा अनेकांनी केल्या पण त्यांच्या सरासरीच्या जवळपास कोणालाही जाता आले नाही.

वाचा-
ब्रॅडमन यांनी १९२८ ते १९४८ या काळात इंग्लंडविरुद्ध झालेल्या प्रत्येक सामन्यात शतकी खेळी केली. या काळात ब्रॅडमन यांनी १९ शतकं केली. १९३० मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर त्यांनी ३३४ धावा केल्या होत्या.

हा विक्रम नंतर मोडला गेला. पण त्यावेळी एका डावात त्रिशतक झळकावणे हे स्वप्नवत होते. ब्रॅडमन यांनी १९३४ मध्ये इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा त्रिशतक करत ३०४ धावा केल्या.

वाचा-
क्रिकेटमधील या डॉनचा आवडता खेळाडू होता भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. मी कसा खेळत होते हे आठवले तर मला या मुलाची आठवण येते, असे ब्रॅडमन सचिन बद्दल म्हणाले होते. सचिनने शेन वॉर्न सोबत ब्रॅडमन यांची भेट घेतली होती.

ब्रॅडमन यांनी ५२ कसोटीतून ९९.९४च्या सरासरीने ६ हजार ९९६ धावा केल्या होत्या. त्यात २९ शतकं आणि १३ अर्धशतकांचा समावेश होता. गोलंदाजी करत त्यांनी २ विकेट घेतल्या होत्या. प्रथम श्रेणीतील २३४ सामन्यायत त्यांनी ९५.१४च्या सरासरीने २८ हजार ०६७ धावा केल्या होत्या. यात ११७ शतकं आणि ६९ अर्धशकांचा समावेश आहे. नाबाद ४५२ ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here