नवी दिल्ली: भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी न्यूझीलंडने भारताचा १० विकेटनी पराभव केला. भारतीय संघाच्या या पराभवावर माजी कर्णधार कपील देव यांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

वाचा-
न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी खराब कामगिरी केली. न्यूझीलंड संघाचे कौतुक करावे तेवढे कमी, त्यांनी चांगला खेळ केला. तीन सामन्यांच्या वनडेनंतर कसोटीत देखील त्यांनी शानदार कामगिरी केली. या सामन्यातील भारतीय कामगिरीवर नजर टाकली तर मला कळत नाही की संघात इतके बदल का केले जात आहेत.

वाचा-
जवळ जवळ प्रत्येक सामन्यात नवा भारतीय संघ मैदानात उतरतो. कोणताच खेळाडू संघात नियमीत नाही. जर तुमचे स्थान सुरक्षित नसेल तर कामगिरी चांगली होणार नाही. फलंदाजांमध्ये मोठी नावे असून देखील दोन्ही डावात २०० धावसंख्या करता आली नाही. याचाच अर्थ तुम्हाला अधिक योजना आणि रणनिती आखावी लागले, असे देव म्हणाले.

वाचा-
भारतीय संघात केएल राहुलला स्थान नाही. खर तर फॉर्मच्या आधारे तो संघात हवा. जेव्हा तुम्ही संघ तयार करता तेव्हा खेळाडूंना विश्वासात घेणे गरजेचे असते. तुम्ही अधिक बदल करता तेव्हा त्याला काही अर्थ नसतो. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण तो संघाबाहेर आहे. एखादा खेळाडू जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला प्रत्येक मॅच मध्ये खेळवले पाहिजे, असे देव यांनी सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here