वाचा-
शफालीने पहिल्या सामन्यात १५ चेंडूत (पाच चौकार आणि एक षटकार) २९ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात १७ चेंडूत ३९ धावांचा पाऊस पाडला. यात २ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. शफालीच्या या धडाकेबाज खेळीमुळे तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशविरुद्धच्या खेळीमुळे हरियाणाच्या या १६ वर्षी क्रिकेटपटूला लेडी सेहवाग असे नाव मिळाले आहे.
वाचा-
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर आयसीसीने शफालीच्या सामनावीर पुरस्कारासहचा फोटो शेअर केला आहे. शफालीने दोन सामन्यात ७ चौकार, ५ षटकारांसह ६८ धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राईक रेट २१२.५० इतका आहे.
वाचा-
शफालीच्या या धमाकेदार खेळीचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.
युझर्स म्हणाले ही तर लेडी सेहवाग…
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times